कोरोनावर मात करणाऱ्या मलंगगड पट्ट्यातील पत्रकार/कॅमरामनने स्कुटरने गाठले घर

डोंबिवली :(श्रीराम खंडू)  कल्याण -डोंबिवली परिसरात कोरोना पसरत चाललेल्या व्हायरसमुळे परिस्थितीत बिकट झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाच आठवड्यापूर्वी मलंगगड पट्ट्यात राहणाऱ्या एका पत्रकार/कॅमेरामनने रुग्णावाहिका न मिळाल्यामुळे स्वत: स्कुटर चालवत थेट हॉस्पिटल गाठले होते. कोरोनावर मात केल्यानंतर या पत्रकार-कॅमेरामनने शनिवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्कुटरवरून घर गाठले आणि त्याचे फटाके-आतषबाजीने गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.
मलंगगड पट्ट्यातल्या ढोके गावात राहणारा शुभम साळुंके या तरुणाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. शहरात वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याचे रोज दिसून येते. तोच प्रकार ग्रामीण भागात सुद्धा अनेकांना अनुभवायला मिळत आहे. 

कोरोनाची लक्षण जाणवायला लागल्यामुळे शुभमने रुग्णवाहिका मिळत नसल्याने स्वतः स्कुटर चालवत डोंबिवलीमधील बाज आर. आर. हॉस्पिटल गाठले. शुभम हा पत्रकारितेचे शिक्षण घेत काम करून स्वतःचे घर सुद्धा चालवतो. शुभमच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वडील नाहीत. स्वतःचे आणि भावाचे शिक्षण करीत घर चालवतो. त्यातच त्याला कोरोनाची लागण झाली. उपचारांसाठी पैसे आणणार कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. अखेर ग्रामीणचे आमदार राजू पाटील, मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील आणि काही मित्रांच्या मदतीमुळे आर. आर. हॉस्पिटलमध्ये शुभमला दाखल करण्यात आले. 7 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षण न आढळल्या मुळे शुभमला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर स्वतः पुन्हा आपल्या स्कुटरने डोंबिवली ते ढोके असा प्रवास केला. विशेष म्हणजे कोरोनावर मात करत घरी आल्यावर गावकऱ्यांनी शुभमचे स्वागत केले. गावात चक्क फटाके आणि आतषबाजी केली. हार-फुले, दिवे लावत जोरदार स्वागत केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट