२७ गावांची नगरपालिका करण्याचा पुनर्विचार करा मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- by Adarsh Maharashtra
- Jul 16, 2020
- 1269 views
डोंबिवली:(श्रीराम खंडू) कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमधून ९ गाव वगळून नगरपरिषद न बनविता वगळलेल्या उर्वरित ९ गावांचा सामावेश करून २७ गावांची नगरपालिका बनविण्याबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवलीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवावी अशी सर्वांची मागणी होती व तसे ठराव ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शासनास सादर केलेले होते. त्या अनुषंगाने २०१५ मध्ये या सर्व गावांची मिळून एक नगरपालिका करण्याची अधिसूचना शासनाने काढली होती, परंतु महापालिका निवडणुका आधी ६ महिने हद्दीत फेरफार करता येत नाही, या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. गेली जवळ जवळ पाच वर्षे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय स्थगित ठेवला होता. या कालावधीत लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय संघर्ष समिती,स्थानिक नागरिकांकडून पाठपुरावा सुरू होता. तसेच विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहातही हा विषय लोकप्रतिनिधीनी मांडून स्वतंत्र नगरपालिका करावी अशी मागणी केलेली होती असे आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम