भांडूप येथे कार्यरत असलेल्या एसआरपीच्या जवानांनी केला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
- by Adarsh Maharashtra
- Jun 22, 2020
- 418 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी भांडूपमध्ये कार्यरत असलेल्या एसआरपीच्या जवानांनी काल आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्त भांडूप येथील पराग विद्यालयाच्या सभागृहात योगा करुन आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला. सहजयोग या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ वाजल्यापासून एसआरपीचे सब इन्स्पेक्टर रत्नसिंग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
भांडूपला कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्याने प्रशासनाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी
एसआरपीला पाचारण केले आहे. या एसआरपीची ३० जणांची एक तुकडी
डॅफोडील हाय पब्लिक स्कूलच्या शेजारी असलेल्या पराग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सभागृहात वास्तव्यास आहे. काल २१ जून रोजी शिस्तबद्ध पद्धतीत तज्ञांच्या मार्गदर्शना खाली योगा करुन या तुकडीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला. यावेळी एसआरपीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
सब इन्स्पेक्टर रत्नसिंग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत ३० जणांच्या एका प्लॅटूनची राहाण्याची, जेवणाची व्यवस्था भांडूप येथील पराग विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम