रस्त्याच्या कामामुळे टाटा कॉलनीतील रस्ता संपूर्ण चिखलमय

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंड येथील टाटा कॉलनी नजीकच्या स्मशानभूमी रस्त्याचे आजपासून काम चालू झाल्याने दिवसभर मातीने भरलेल्या ट्रकची ये-जा चालू झाली आहे. या ट्रकमधील माती खाली रस्त्यावर पडल्याने व त्याच पडलेल्या मातीतून ट्रक व इतर वाहनांची वाहतूक चालू असल्याने टाटा कॉलनीतील संपूर्ण रस्ता मातीने माखला आहे. त्यातच मध्येच पडणाऱ्या पावसाने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून चालताना पायाला लागलेला चिखल येथील सर्व इमारतीभर पसरला आहे.

रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्याने याबाबतीत काहीही बोलण्यास नकार दिला. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

आधीच टाटा कॉलनीतील रस्त्यांची पालिकेच्या सफाई कामगारांमार्फत योग्य प्रकारे साफसफाई होत नाही आहे, त्यात संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने टाटा कॉलनीतील नागरिकांनी नेहमी घाणीतच राहायचे का ?  स्थानिक नगरसेवकांनी वेळीच लक्ष घालून टाटा कॉलनीतील रस्त्यावर होणारी घाण, चिखल याबद्दल संबंधित पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांना जाब विचारावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पवार यांनी केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट