मुलुंड मधील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या जागेवरील भव्य कोविड सेंटरचे काम प्रगतीपथावर, येत्या काही दिवसांत कार्यान्वित

मुलुंड(शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड पश्चिमेकडील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या भव्य जागेवर १८०० खाटांचे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणारे व पूर्णपणे वातानुकुलीत असणारे कोविड रुग्णालय उभे राहात असून त्याच्या उभारणीचे काम सिडकोला देण्यात आले आहे. अनेक छोटे, मोठे कंत्राटदार या रुग्णालयाच्या उभारणीसाठी कार्यरत असून हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. सिडकोच्या कुशल आणि अनुभवी अभियांत्रिकी टीमच्या देखरेखीखाली हे रुग्णालय उभे राहात असून ते पूर्ण व्हायला असून ७ ते १० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. ए ते एफ नावाने सहा तंबूमध्ये कोविड उपचार केंद्र असणार असून सातव्या तंबूत कंट्रोल रूम असणार आहे. यात सीसीटीवी मेनेज्मेंट व इतर सर्व सुविधांचे कंट्रोल पॅनेल व मेनेज्मेंट टीम बसणार असल्याचे समजले. सध्या खाटा बसवायचे व वातानुकुलीत यंत्रणा बसवायचे काम चालू येथे चालू असून ऑक्सिजन यंत्रणा बसवणे अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून आले. 

सिडकोचे इंजिनियर व त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली हे काम चालू असून लवकरच पूर्ण होणार असल्याचे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेकडे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे केरळ हून वैद्यकीय कर्मचारी मागविण्यात आले आहेत. पालिकेकडून अद्याप हे कोविड सेंटर हस्तांतरणाचा कोणताही आदेश आला नाही आहे तरीही पालिकेकडे या कोविड सेंटरसाठी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध झाले तर लगेच हे रुग्णालय आम्ही चालू करुन देवू शकतो, असे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट