मुंबईच्या महापौरांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी / मास्क बांधुन मुक धरणे आंदोलन

मुंबई :आज मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर  शिंदे, पक्षनेता श्री विनोद मिश्रा व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट तसेच अन्य वरिष्ठ नगरसेवक यांनी मुंबईच्या महापौरांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी / मास्क बांधुन मुक धरणे आंदोलनकेले.

आजपर्यंत करोनाग्रस्त रूग्णांना बेड आयसीयु व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून हजारो मुंबईकर रूग्णांची प्राणज्योत मालवली आहे.करोनाग्रस्त रूग्णाची प्राणज्योत मालविल्यानंतर करोनाग्रस्त मृतदेह लपेटण्यासाठी येणारे बंदिस्त कफन पिशवी Corona Dead Body Cover ही किरकोळ बाजारात रू 500 ते रू 1400 ला मिळते.

महापालिकेतील विविध रूग्णालयात त्याची खरेदी गेले 2 महिने याच दराने झालेली आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात (14/04/2020) तत्कालीन प्रशासन  यांनी करोनाग्रस्त कफन पिशवी खरेदीसाठी व करोनासाठी इतर अनेक बाबींच्या निविदा मागविल्या होत्या

महापालिकेतील सत्ताधीश व प्रशासनाने संगनमताने या कफन निविदेसाठी राखीव किंमत रू6700/- म्हणजेच बाजार भावापेक्षा पाचपट जास्त नमूद केली!

मृतदेहांच्या टाळूवरिल लोणी खाण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक, गंभीर व घृणास्पद आहे.

डेड बाॅडी कव्हरसाठी एकूण 10 जणांनी निविदा भरल्यात.परंतु त्यातील 9 जण गुणवत्तेवर अप्रतिसादात्मक ठरतात व केवळ एकमेव कंत्राटदार गुणवत्तापूर्ण ठरतो हे  संदेहपूर्ण आहे.

मास्क/ सॅनिटायझर/ निर्ज॔तुकिकरण यंत्र/ बेडस / क्वारंटाईन सेंटर बांधणी / इन्फ्रा रेड थर्मामीटर/ पल्स आक्सीमीटर /जेवण/ धान्य वाटप आदी सर्वच चढ्या भावाने करण्यात आलेल्या खरेदी बाबत श्री प्रभाकर शिंदे यांनी आयुक्तांना 13 मे रोजी लेखी पत्र पाठविले आहे. त्याची साधी पोच सुद्धा अद्याप मिळालेली नाही.

सदर निविदा रद्द झाल्याचे सांगून सध्याचे आयुक्त या प्रकरणात क्लिन चिट देऊ शकणार  नाहीत.

या निमित्ताने कितीतरी प्रश्न उपस्थित होतात त्याचा खुलासा सत्ताधीशांना  महापौरांसह प्रशासनास करावा लागेल.

1.महापालिकेतील मध्यवर्ती खरेदी विभाग अधिकाऱ्यांनी बाजारभावापेक्षा पाचपट जास्त राखीव किंमत निविदेत कशाच्या आधारावर नमूद केली?

2. पाचपट जास्त भावासाठी कोणाचा आदेश/ फतवा / फर्मान / राजकीय दबाव होता?

3. दोषी अधिकाऱ्यांवर आयुक्तांकडून काय कारवाई करण्यात आली? कोणाची चौकशी करण्यात आली? कुणाला निलंबित करण्यात आले?

4.हे सर्व उपद्व्याप ज्यांच्या कारकीर्दीत केलेत ते तत्कालीन आयुक्त ह्यास कितपत जबाबदार आहेत?

15 मार्च 2020 ते 15 जून 2020 या कोविड-19 सारख्या गंभीर रोगाच्या संकट काळात / लाॅकडाऊन मध्ये महापालिकेतील सत्ताधीश व प्रशासन यांचा भ्रष्टाचार हा अंत्यत दुर्दैवी आहे

या काळातील महापालिकेतील सर्वच खरेदीची / विविध  निविदांची चौकशी त्रयस्थ त्रिसदस्यीय निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत करण्यात यावी अशी मागणी श्री प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

सदर आंदोलनात नगरसेविका उज्ज्वला मोडक,रिटा मकवाना, दक्षा पटेल,ज्योती अळवणी,राजश्री शिरवाडकर,स्वप्ना म्हात्रे, नगरसेवक  कमलेश यादव, अभिजित सामंत, सुनिल यादव,अॅड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत सहभागी झाले

संबंधित पोस्ट