लॉकडाऊनमध्ये बँकेकडून वसूलीसाठी दहशत आणि धमक्यांमुळे पोलिसांकडे धाव वरिष्ठ नागरिक भीतीच्या छायेखाली
- by Adarsh Maharashtra
- Jun 14, 2020
- 545 views
मुंबई :लॉकडाऊनच्या काळात ईए्मआयचे हप्ते भरण्याचा कालावधी तीन महिने पुढे ढकलण्यात आला असला तरी इंडियाबुल्स बँकेने वसूलीसाठी नेमलेले एजंट दहशत आणि धमकी देत असल्यामुळे वरिष्ठ नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत असून त्यांच्यापैकी एकाने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तसेच पोलिस आयुक्तांनाही ई मेल करून हा संतापजनक प्रकार कळवला आहे.
सुरेंद्रकुमार सुराणा हे वरिष्ठ नागरिक हॉटेल व्यावसायिक असून लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सर्व वित्त कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते २० मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत न भरण्यास मुभा दिली आहे. त्यांनी इंडियाबुल्सकडून घेतलेल्या कर्जालाही हा नियम लागू आहे. असे असतानाही उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त असलेल्या सुरेंद्रकुमार सुराणा यांना अर्वाच्च शब्दात शेजा-यांच्यासमोर अवमान करण्याचे प्रकार इंडियाबुल्स बँकेच्या कलेक्शन ऑफिसरने केले असून त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. हे प्रकार वारंवार होत आहे. त्याचबरोबर 9324340811 क्रमांकाच्या मोबाईल वरूनही वारंवार फोन येत आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत खार पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून हे प्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्त व संबंधितांनाही या तक्रारीची प्रत पाठवली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम