कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णासाठी डब्यातून जेवणासोबत दारू सुद्धा पाठवली
- by Adarsh Maharashtra
- May 25, 2020
- 650 views
पुणे, २५ मे:- देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून याठिकाणी काल दिवसभरात ३,०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे १७२५ नवे रुग्ण आढळले. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई , ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, २२ मेरोजी येथील पॉझिटिव्ह दर ३१ टक्के होता. जो, १६ मेरोजी ४१ टक्के होता. पालघर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर २२ मरोजी वाढून ४२ टक्के झाला आहे. नाशकात तो ५ टक्के, तर रायगडमध्ये १३ टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत.येथे एकूण २७,००० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.पुण्यातही दिवसेंदिवस आकडा वाढत असताना इतर समस्या देखील उभ्या राहात आहेत. कारण पुणेकर कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा नेम नाही. एकीकडे पुण्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर अशाही परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी कोविड सेंटरवरच दारूच्या बाटल्या मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील मिकमार कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. नानापेठेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना मिकमार कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.या रुग्णांसाठी त्यांच्या घरून जेवनाचा डबा येत असतो. आज सकाळी नानापेठेतील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जेवणाचे डबे आले होते पोलिसांनी या डब्याची तपासणी केली असता आत चार दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट आढळून आला. जेवणाच्या डब्यासोबत दारूच्या बाटल्या पाहून पोलीस आणि पालिका प्रशासनही हादरून गेलं पोलिसांनी ज्या तरुणाने हा डबा आणला होता, त्याला चांगलाच काठीने प्रसाद देऊन आल्या पावली परत पाठवून दिले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कोविड सेंटरमध्येच दारू पार्टीचा डाव होता. पण, गेटवर तपासणीमुळे हा डाव पोलिसांनी उधळून लावला.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम