अम्फान चक्रीवादळप. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- May 22, 2020
- 1132 views
बशीरहाट (कोलकाता),पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचं हवाई सर्वेक्षण केलं. केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.चक्रीवादळामुळे झालं नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगालचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. तसंच पश्चिम बंगालला १ हजार कोटी रूपयांची तर मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख आणि गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना १ लाख रूपयांची तात्काळ मदत जाहीर केली. दरम्यान, केंद्र सरकारची एक टीम पश्चिम बंगलच्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही टीम त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करेल आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.या दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील त्यांच्यासोबत होत्या. दोघांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं हवाई पाहणी केली. अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाचा दौराही करणार आहेत.यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न केले. तरीही आम्ही ८० जणांना वाचवू शकलो नाही. याचे दु:ख आहे. शेती, वीज आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आता आम्हाला त्यांची मदत करायची आहे. दोन्ही सरकारे मिळून मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम