कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा प्रयत्नांना यश!अवकाळी नुकसानग्रस्तांना अनुदान मंजुर!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील २९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने कर्जत मतदार संघात अनेक नागरिकांच्या घरांचे, शेतीचे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे येथे प्रंचड चिंताजनक वातावरण पसरले होते. अशावेळी या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी याकरता कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व रायगड जिल्हा अधिकारी यांना पत्र लिहुन नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी केली होती, त्याला अखेर यश आल्याचे दिसत आहे.
 देशात कोरोनाचे संकट असल्साने संपुर्ण देश लाॅक डाऊन आहे. असे असतानाच येथे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असतानाच कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार थोरवे हे गोरगरीबांना धान्य वाटप करण्यात व्यस्त होते. असे असतानाच अचानक कर्जतमधेही अवकाळी पावसाने हाहाःकार उडवून दिला होता. त्यामधे कोणाचा घरांची छप्परे उडाली, तर कोणाच्या शेतीमधे पिके कोलमडुन पडली होती. त्यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी या सर्व नुकसान ग्रस्तांचा नुकसानीची पाहाणी केली आणि  या नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवुन देण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा मिळाला होता.
रायगड जिल्हा अधिकारी यांनी नुकताच १८ मे रोजीचा आदेशानुसार कर्जत तालुक्यासाठी २७ लाख ४९ हजार ६४८ रुपये आणि खालापुर तालुक्यांसाठी ५५,७२,११२ रुपये अनुदान मंजुर झाल्याची माहिती कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी दिली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत मिळणार असल्साने समाधान पसरले आहे. तसेच कर्जतचे आमदार यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या या अनुदानामुळे कर्जतचे आमदार यांचे आभार व्यक्त होते. दरम्यान कर्जत तालुक्यांत अवकाळी वादळीवारा पावसाने थैमान घातल्याने येथे प्रंचड नुकसान झाले होते. त्यावेळी ३० एप्रिल रोजी नुकसानग्रस्तांना तत्काल मदत मिळावी यासाठी आमदारांनी मदतीची मागणी केली होती. त्यानुसार हे अनुदान मंजुर झाल्याचे बोलले जात आहे. तसेच या मदतकार्याने मोठा दिलासा कर्जत मध्ये नुकसान झालेल्यांना मिळणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट