पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंडच्या एम एमटी अग्रवाल रुग्णालयाच्या सहा जणांना कोरोणाची लागण झाली असून त्यात दोन डॉक्टर तर चार वार्डबॉयचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना या कोरोना विरुध्दच्या लढ्यात योद्ध्यांचे कार्य करणाऱ्या पालिकेच्या डॉक्टरांना व कर्मचारी वर्गाला देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याने अग्रवाल रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी चिंतेत आहेत.


मुलुंडमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. मुलुंडमधील पालिकेच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात कोविड १९ उपचार केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढती आहे. परिणामी या रुग्णांची सेवा करताना, त्यांच्यावर उपचार करताना येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील या रोगाची बाधा झाली असून त्यात चार वार्डबॉय व दोन डॉक्टरांचा समावेश असल्याचे समजले. 

काही दिवसांपूर्वी येथील एका वार्डबॉयला कोरोणाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या इतर तीन वार्डबॉयची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट देखील पॉज़िटिव आल्याचे आढळून आले आहे. या चौघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच मुलुंड पूर्व येथील मिठागर शाळेचे कोविड सेंटर उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणारे व एमटी अग्रवाल रुग्णालयात कार्यरत असलेल्या दोन डॉक्टरांना देखील कोरोणाची बाधा झाली असून त्यांच्यावर देखील उपचार करण्यात येत असून उपचाराला या सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे सूत्रांकडून समजले. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट