वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाचा मृत्यू, वडिलांचा आरोप
- by Adarsh Maharashtra
- May 18, 2020
- 579 views
मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले) कोरोनामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण पडला असून इतर आजाराने आजारी असणाऱ्या रुग्णांना देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशीच एक घटना कांजूरमार्ग येथील कर्वेनगर येथे घडली असून तेथील सुभाष साळुंखे नामक २५ वर्षाच्या व्यक्तीला वेळेवर रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला असल्याचा आरोप मृतांच्या वडिलांनी केला आहे.
कांजूरमार्ग येथील कर्वेनगरमध्ये राहणारे प्रकाश साळुंखे यांचा मुलगा सुशांत साळुंखे गेल्या काही दिवसांपासून क्षयरोगाशी लढा देत होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेणे आवश्यक होते. परंतु १०८ नंबरला फोन करूनही पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने हॉस्पिटलात नेणे शक्य झाले नाही आणि त्यातच उपचाराअभावी दुर्दैवाने त्याचा मृत्यु झाला.
'सकाळी ९ वाजल्यापासून आम्ही व आमच्या इमारतीतील इतर सदस्यांनी वारंवार १०८ क्रमांकावर फोन करून सुद्दा रुग्णवाहिका मिळू शकली नाही. शेवटी एकच्या सुमारास माझ्या मुलाचा घरातच मृत्यु झाला. मृत्यु झाल्यानंतर ३ च्या सुमारास रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर वेळेवर त्याला रुग्णालयात पोचवता आले असता व वेळेवर त्यांच्यावर उपचार करता आले असते व त्याने माझा मुलगा वाचला असता' असा आरोप मृत सुशांत साळुंखेच्या वडिलांनी केला आहे.
कांजूरमार्ग येथील कर्वेनगरमध्ये राहणारा सुशांत साळुंखे एका दुकानात कामाला होता. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून तो घरातच होता. त्याच दरम्यान तो आजारी पडला. त्याला क्षयाचा त्रास होता. मंगळवार पासून त्याची प्रकृती अधिक खालवायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव सुरू होती.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम