पुण्यात या भागात कडेकोट १०० टक्के लॉक डाऊन

पुणे: शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सोमवारपासून 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हे आदेश 17 मेपर्यंत कायम असतील. या कालावधीत केवळ खासगी दवाखाने सुरू ठेवण्यात येणार असून, इतर सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश रविवारी काढले आहेत.

या ठिकाणी असणार 100 टक्के लॉकडाऊन

मंगळवार पेठ-जुना बाजार, पर्वतीदर्शन परिसर 1,2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, आंबील ओढा कॉलनी परिसर, दत्तवाडी परिसर, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानी पेठ कसबा  विश्रामबागवाडा, भवानी पेठ कसबा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ (पै), गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ(पै), रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडी पेठ, कोंढवा बुद्रुक काकडेवस्ती, उंड्री, होलेवस्ती कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड-शिवतारा इमारत, चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत पुणे स्टेशन-ताडीवाला रोड, पर्वती, तळजाई वस्ती 1,2, धनकवडी, बालाजीनगर, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी साईसमृद्धी परिसर, लोहगाव, कालवडवस्ती नगर रोड, गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर 1,2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा, टी.पी. स्कीम, फुलेनगर, रामनगर वानवडी - रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी, सय्यदनगर 1, 2, 3 कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, मिठानगर, एस.आर.पी.एफ. वानवडी, शिवाजीनगर, कामगार पुतळा, कामगार पुतळा वसाहत, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉंग्रेस भवन पाठीमागील बाजू, चिंतामणीनगर, मुंढवा सय्यदनगर मगर पेट्रोल पंपाजवळील परिसर, गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, मुंढवा वेताळनगर परिसर, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर हडपसर - मुंढवा हांडेवाडी रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, या भागात गरज भासल्यास महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसाठी भाज्या आणि दुध उपलब्ध करून दिले जाणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट