"करोना'चा पिंपरी-चिंचवडमधील चौथा बळी

पिंपरी :- 'करोना'मुळे पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा 'करोना'चा शहरातील चौथा बळी ठरला आहे. भोसरी येथील 81 वर्षीय महिलेचा पुण्यात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. तर यापूर्वी शहरात उपचार घेणारे मात्र हद्दीबाहेर रहिवाशी असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा ८ वर पोहोचला आहे. तर भोसरी परिसरातील रहिवाशी असलेल्या आणखी एकाला करोनाची बाधा झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथे राहणाऱ्या एका 81 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. तिच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. रविवारी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत चार जणांचे करोनामुळे बळी गेले आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या शहराच्या हद्दीबाहेरील चौघांचा मृत्यू झाला आहे.शहरातील करोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला. थेरगाव येथील पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर 20 एप्रिल रोजी पुण्यात उपचार घेणाऱ्या निगडीतील महिलेचा मृत्यू झाला. तर पुण्यातमध्ये राहत असलेल्या परंतु वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचाही याच दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर 24 एप्रिल रोजी ओटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या एका पुरूषाचा मृत्यू झाला. तर 29 एप्रिल रोजी खडकी येथे राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. 6 मे रोजी शिवाजीनगर आणि येरवडा, पुणे येथे राहणाऱ्या दोन महिलांचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज 10 मे रोजी भोसरी येथील 81 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात 83 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी शहरातील एक तर शहराबाहेरील दोन रुग्ण करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे शहरातील बाधितांची संख्या 168 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 81 जण करोना मुक्‍त झाले आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट