खासदार बारणे यांच्या कर्जतचा आढावा बैठकीकडे आमदारांसह तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची पाठ!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत विेधानसभा मतदार संघात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तहसिल कार्यालयात नुकताच अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलाविली होती, मात्र या आढावा बैठकीकडे कर्जत मतदार संघातील सेनेचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांसह शिवसेनेचा  काही मुख्य पदाधिकाऱ्यांनी सपशेल पाठ फिरविली आहे. त्यामुळे कर्जतमधे सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे.
सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळुन मावळ मतदार संघ बनला आहे. या मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघ हे रायगडात आहेत. त्यापैकी उरण आणि पनवेल विधानसभा मतदार संघ बऱ्यापैकी सबळ अाहेत. तर कर्जत विधानसभा मतदार संघाचा बहुतांश भाग दुर्बल आहे. त्यामुळे देशात सध्या कोरोनाचे संकट असताना येथे अनेकासंमोर उदरनिर्वाहाचा सवाल निर्माण झाला आहे. कर्जतचे अनेक पक्षांचे नेते नागरीकांना मदतीचा हात देत आहेत. कर्जत मतदार संघाचे आमदार तर दारोदारी जावुन मतदारसंघात अन्नधान्याचे वाटप गोरगरीबांना करीत आहेत. असे असतानाच मात्र मावळचे खासदारांनीही या मदत कार्यात पुढे यायला हवे असा सूर आता काही भागांतुन काढला जात आहे.

 नुकताच मावळचे खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे यांनी कर्जतमधे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत येणेसाठी कर्जत मतदार संघातील काही पदाधिकाऱ्यांना बोलाविण्याता आले होते. मात्र खासदारांचा या आढावा बैठकीकडे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांसह कर्जतचे तालुकाप्रमुख व महत्वाचा पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे खासदारांवर कर्जतचे शिवसेनेने मुख्य पदाधिकारीही नाराज आहेत की नक्की काय? अशी चर्चा राजकीय दुनियेत आहे.
 दरम्यान कर्जत तालुक्यांतील अनेक विविघ भागांतील लोकांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे. असे असतानाच कर्जत तालुक्यांतील विविघ हात मदतीसाठी पुढे आल्याचे दिसुन आले आहे. शासकीय अधिकारीही प्रंचड सतर्क राहुन जागोजागी मदतकार्य करीत आहेत. मात्र देश लाॅक डाऊन झाल्यानंतर येथे खासदारानी सुद्धा मदत करावयास हवी होती, असे बोलेल जात आहे. तर अजुनही काही दिवसात मावळचे खासदार कर्जतला येतील आणि थेट मतदारांना मदतीचा हात देतील अशी अपेक्षा येथिल जनतेला लागुन आहे. त्यामुळे खासदार कर्जतचा या दुर्बल घटकांना काय मदतीचा हात देतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागुन राहीले असल्याचे सांगणेत येते.
तसेच इतरत्र ठिकाणासह कर्जत तालुक्यांतीलही काही भागांत अवकाळी वादळ वारा आणि पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशा मागणी कर्जतचे आमदार थोरवे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. त्यापाठोपाठच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याची लेखी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. निकसानग्रस्तांना मदत तर हवीच
आहे, पण मात्र कर्जत तालुक्यांतील काही भांगातील गोरगरीबांना मदतीचीही कोरोना कालात अपेक्षा आहे. त्यामुंले कर्जतचा आमदारांपाठोपाठ खासदारांनीही गरजूंना मदत करणेसाठी आता पुढे येण्याची मागणी होत आहे. कर्जत तालुक्यांतील ग्रामपंचायत सदस्यापासुन ते थेट आमदारांपर्यत ठिकाठिकाणी मदतकार्य पोहोचविण्यास मग्न आहेत. आता खासदारांचा वाटेकडेही गरजुंचे डोळे लागुन आहेत, कर्जत तालुक्यातील जनता दोन टर्म खासदार बारणे यांचा मागे उभे राहीली आहे.त्यामुळे आता या संकट काळात मावळचे खासदार कशा पद्धतीने कर्जत मतदरसंघातील मतदाराचा मागे उभे राहतात, याकडे संपुर्ण कर्जत मतदार संघाचे लक्ष लागुन राहीले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट