गैंगस्टर अरुण गवळीच्या मुलीचे अभिनेता अक्षय वाघमारे सोबत उद्या होणार लग्न
- by Adarsh Maharashtra
- May 07, 2020
- 523 views
मुंबई - गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या ८ मे २०२० लग्नगाठ बांधणार आहेत.
२९ मार्च रोजी या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही.
आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत.
मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे.गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे.
या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयने सांगितलं. सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील योग्य वेळी धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल अशीही माहिती त्याने दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम