देशभरातील लाॅकडाऊन 17 मे पर्यंत वाढविला : रेड झोन साठी सवलत नाहीच

महाराष्ट्रातील रेड झोन जिल्हे-मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औऱंगाबाद, सातारा, धुळे, अकोला

दिल्ली: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला असून, त्याची अंमलबजावणी चार मे पासून होणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या दुसऱ्या लाॅकडाऊनची मुदत तीन मे रोजी संपत आहे.

प्रत्येक लाॅकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी देशाला संबोधून भाषण केले होते. तिसऱ्या  लाॅकडाऊनची घोषणा मोदींनी न करता एका नोटिफिकेशऩद्वारे करण्यात आली. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.

ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

ग्रीन झोन म्हणजे जिथे कोरोनाची एकही रुग्ण गेल्या 21 दिवसांत सापडलेला नाही.

रेड झोन- एकूण रुग्णांची संख्या, वाढीचा वेग, टेस्टिंगचे प्रमाण यावर ठरविण्यात येणार आहे.

जे जिल्हे ग्रीन किंवा रेड झोन नसतील ते आॅरेंजमध्ये गृहित धरले जातील

हे झोन दर आठवड्याला निश्चित केले जातील. राज्यांना रेड किंवा आॅरेंज झोनमध्ये जिल्हे समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांची तीव्रता कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही. गेल्या चोवीस तासांत देशांतील कोरोना रुग्णांचा आकडा 35 हजारांहून अधिक झाला आहे. राज्यातील एकूण 14 जिल्हे तर देशातील 120 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट