देशभर लाॅक डाऊन; पर्यटन व्यावसायिकांचे हाल! कोरोना संकटामुळे अनेक व्यावासायीक संकटात!
- by Adarsh Maharashtra
- May 01, 2020
- 363 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- संपुर्ण जगात कोरोना संकटात आल्याने देश लाॅक डाऊन आहे. या कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्याकरता संपर्ण देशात जमावबंदी आदेश लागु असल्याने कोणीही घराबाहेर पडत नाही. परींणामी सुट्टीचा मोसम असतानाही इतरत्र ठिकाणासह कर्जत तालुक्यांतील जगप्रसिद्ध अनेक पर्यटनस्थळे ओस पडल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळ पर्यटन व्यावसायीकांचे चांगलेच हाल होत आहेत.
याबाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुका पर्यटन व्यावसायासाठी जगात प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध असणारे माथेरान पर्यटनस्थळ ही याच तालुक्यांत आहे. मात्र सध्या देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याने संपुर्ण देशात लाॅक बंदी करण्यात आली असुन संचारबंदी करण्यात आली आहे. त्यातच आता “मे” गरमीचा महीना सुरु असल्याने माथेरान व अन्य पर्यटन स्थळी गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करत असतात, मात्र या वर्षी हेच पर्यटनस्थळ ओस पडले आहे. तर येथिल व्यावसायीक व्यावसाय बंद असल्याने प्रंचड आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखी काही दिवस येथे असेच वातावरण राहणार असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.
विशेष म्हणजे निसर्गाने बहरलेल्या माथेरान सारख्या पर्यटन स्थळी कोणतेही वाहन जात नाही. असे असतानाच हात रिक्षा आणि घोड्यांवर येथे प्रवास करणेत येतो. मात्र आता या शहरात पर्यटकच येत नसल्याने येथिल घोड्यांचाही उदरनिर्वाहाची समस्या घोडे मालकांसमोर निर्माण झाली आहे. असे असतानाच काही दानशूर व्यक्ती या घोड्यांचे खाद्य मोफत वाटप करीत आहेत. मात्र हे धान्य किती दिवस पुरणार? असा सवाल येथे उपस्थितीत होत आहे. त्यामुळे शासन स्तरावरून याचा विचार होणेची गरज असल्याची मागणी काही घोडे मालकांमधुन केली जाते.
दरम्यान माथेरान शहरात रोज हजारो पर्यटक येतात. येथिल नागरीकांचा उदरनिर्वाह हा या पर्यटकावंरच अवळंबुन असल्याने आता या शहरात पर्यटकच नसल्याने येथे स्थानिकांसमोरही उदरनिर्वाह कसा करायचा, याबाबत चिंता पसरली आहे. तसेच माथेरानसह कर्जत तालुक्यांत विविध रिसाॅर्ट, हाॅटेल, फार्म आहेत, येथेही अनेक पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात, मात्र आता त्यांचाही उद्योग संकटात सापडल्याने कसे होणार, अशी भिती त्यांना भेडसावत असल्याचे सांगणेत येत आहे. त्यामुळे भविष्यात या कोरोनाची भिती काही महीने अशीच राहील्यास पर्यटन व्यावसाय आणि या ठिकाणचे स्थानिकांसमोर कोरोना संकटा पेक्षा माझे उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकणार असल्याची चर्चा जनमानसात सुरु आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसाय असणाऱ्या ठिकाणांना उदरनिर्वाहासाठी एक वेगळा पॅकेज शासनाने जाहीर करण्याचीही मागणी आता कर्जत तालुक्यांतील अनेक पर्यटक व्यावसायीकांकडुन केली जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम