अभिनेता ऋषी कपूर ( चिंटू) च्या जाण्याने चेंबूरकरांचे डोळे पाणावळे !
- by Adarsh Maharashtra
- May 01, 2020
- 1076 views
मुंबई; ( जीवन तांबे ) बाॅलीवूडचा चाॅकलेट बाॅय, अभिनेता ते गायक मेरा नाम जोकर ते सनमरे अशा शेकडो चित्रपटाच्या अभिनयातून लाखों चाहत्यांची दिल कि धडकन ठरलेला चेंबूरकरांचा लाडका ऋषी कपूर (चिंटू ) आज काळाच्या पडद्याआड गेल्याने चेंबूकरांचे डोळे पाणावले!
मुंबई उपनगरातील चेंबूरच्या आर के स्टुडिओ आता गोदरेज आर. के झाला आहे. ही वास्तू महामार्गावरून दिसताच आठवण येते ती अभिनेता ऋषी कपूर व त्यांच्या सिनेमाची त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी चेंबूर मध्ये झाला. आणि त्यांनी अभिनयाचा श्री गणेशा येथूनच केला. त्यांनी आतापर्यंत दर्जेदार व कायम आठवणीत राहतील अशी भूमिका केलेले १२० हुन अधिक सिनेमा सिनेमा सृष्टीला दिले आहेत. त्यामुळे त्याचे नांव कायमचे अजरामर राहील यात शंका नाही. वयाच्या साठ वर्ष पर्यंत ते चेंबूर मध्ये वास्तवला होते. त्यांनी अभिनेते पृथ्वीराज कपुर व राज कपूर यांचा वसा पुढे नेटाने चालवीला.
राज कपूर यांनी जेव्हा १९४७ साली आर. के स्टुडिओची निर्मिती चेंबूर मध्ये चार एकर मध्ये उभे केली. कपूर कुटुंबाचे एक वैशिष्ट्य कायम चालत असे ते म्हणजे आपल्या कामगाराना हाताला काम दिले पाहिजे. स्टुडिओ निर्माण केल्यानंतर परिसरातील नागरिकांना रोजगार मिळाला होता.त्यामुळे कामगार कायम आनंदात असल्याचे आर. के ची विक्री केली तरी ऋषी कपूर यांनी कामगारांच्या देणी स्वतः दिल्या.
या स्टुडिओत अभिनेते राज कपूर असताना होळी, गणेश उत्सव कपूर कुटुंब मोठ्या आनंदात साजरा करीत होते. जेव्हा अभिनेते राज कपूर याचे निधन झाले तेव्हा पासून कुटुंब होळी उत्सव साधेपणाने साजरा करू लागले.
मात्र ७० वर्षांपासून गणेश उत्सवाची परंपरा आजतागत सुरू होती. या उत्सवात ऋषी कपुर, रणधीर कपुर, नितु सिंग, राजीव कपुर व पूर्ण कपूर कुटुंब हिरीरीने भाग घेऊन आनंद लुटत असत. या याच वेळी अनेक कामगार ही त्याच्या आनंदात सहभागी होत होते.
चेंबूरचा आर. के. स्टूडिओ व कपूर फॅमिली म्हणजे आम्हा कामगारांचे आपुलकीचे घर, राज कपूर यांच्यापासून सार्वजनिक गणेशोत्सव व होळी हे पारंपारिक सन सुरू करण्यात आले. राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रणधीर कपूर,राजीव कपूर, ऋषि कपूर यांनी ही परंपरा अखंडित सुरु ठेवली.
त्यात ऋषि कपूर हे आम्हा सर्व कामगारांची आस्थेने विचारपूस करायचे मी वयाच्या १८ व्या वर्षापासून स्टूडिओ मध्ये गेली ४५ वर्ष सुतार म्हणून काम करत होतो. ऋषि कपूर व त्यांच्या मातोश्री कृष्णा कपूर ह्या घरातील काही फर्नीचर चे काम असेल तरी 'सदा ये काम तुम ही करो, असे सांगायचे बाहेरगावी चित्रपटाच्या चित्रिकरण्या दरम्यान आम्हा सर्व कामगारांची विशेष काळजी ऋषि कपूर घेत होते.
वैद्यकिय मदत, काही घरगुती अडचण असल्यास आम्हाला तातडिने मदत करीत असत यावर्षि या स्टूडिओची संपूर्ण जागा गोदरेज या नामवंत विकासकाने विकत घेतली तरी आम्हा सर्व कामगारांची संपूर्ण देणी ऋषि कपूर यांनी दिली. सन २०१९ च्या आर.के.स्टुडिओच्या शेवटच्या गणेशोत्सवा दरम्यान ऋषि कपूर यांनी गणेशाचे दर्शन घेतले व भावुक होवून सर्व कामगारांना अभिवादन करुन पुढील उपचारासाठी परदेशी रवाना झाले तेव्हा आम्हा कामगारांना समजले की साहेबांना कॅन्सर या दुर्धर आजार झाला आहे व त्याच्याशी ते लढ़ा देत आहेत आज ऋषि कपूर साहेब आमच्यात नसून आमच्या घरातील माणूसकीतील माणूसपण जपणारा सदस्य निघून गेल्याची खंत जाणवत आहे असे ऋषी कपूरच्या आठवणीने गहिवरून गेलेले सदानंद भीकाजी पिंपळकर ( स्टुडिओत व घरी सुतारकाम करणारे ) बोलत होते.
तर अनंत गुरव यांनी ऋषी कपुर यांना हे आपुलकीने चौकशी करीत असत. राज कपूर व ऋषी कपुर हे क्रिकेट प्रेमी होते. त्यामुळे घाटला गावात राज कपूर नावाने क्रिकेट सामने भरविण्यात येत होते. त्याला मदत ऋषी कपूर करत असत तर मिथुन चक्रवर्ती आवर्जून उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम