मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांचा विधानपरिषदेवर आमदार होण्याचा मार्ग मोकळा
- by Adarsh Maharashtra
- May 01, 2020
- 789 views
दिल्ली:निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलासा देत विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीची तारीखही आयोगाने ठरवली असून २१ मे रोजी ही निवडणूक होणार आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती. पण निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला आहे.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोन वेळा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मे पूर्वी निवड होणे आवश्यक होती.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम