मालेगाव ची वाटचाल व्दि शतकी कडे
- by Adarsh Maharashtra
- Apr 28, 2020
- 915 views
मालेगाव ( चंद्रशेखर गोसावी)-मालेगाव शहरात करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. आताच्या मिळालेल्या माहितीनुसार शहरात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण ११४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात १०२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मालेगाव शहराची रुग्ण संख्या १७१ झाली असून यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालानुसार शहरातील ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते पैकी ४ रुग्णांचे अहवाल हे दुसऱ्या चाचणीत पॉझिटिव्ह आले आहे. तर उर्वरित ३२ अहवाल हे नवीन होते. तर आताच प्राप्त अहवालानुसार १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून शहरातील रुग्णांची संख्या १७१ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात बाधित रुग्णांच्या संख्येत कुठलीही वाढ झाली नसल्याने व त्यातच ७ रुग्ण करोना मुक्त झाल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज एकदम ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहरातील चिंता वाढली आहे.
प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या १७१ झाली असून यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण ७ रुग्ण बरे झाले असून त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये ६ रुग्ण मालेगाव शहरातील असून एक चांदवड येथील तरुण आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम