जमावबंदीकडे आदेशाकडे दुर्लक्ष करीत माॅर्निंग वाॅक करणाऱ्या ३२ जणांवर नेरळ पोलिसांची बेधडक कारवाई!
माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना नेरळ पोलिसांची वाॅर्निंग!
- by Adarsh Maharashtra
- Apr 19, 2020
- 949 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- देशात कोरोनाचे महासंकट आहे. हे संकट दुर करण्यासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. सध्या संपुर्ण देशात लाॅक डाऊन तसेच जमावबंदी आहे. असे असतानाच नेरळ शहरातील माथेरान घाट रस्त्यावर सकाळी माॅर्निंग वाॅक च्या नावावर अनेकजण वावरत असल्याचे नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांना समजले. त्यामुळे आज सकाळी ६ वाजता नेरळ पोलिसांनी माॅर्नींग वाॅक करणाऱ्या ३२ जणांची चांगलीच धरपकड केली आहे.
दरम्यान नेरळ पोलिस ठाण्यात या सर्व माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना आणुन त्यांना नेरळ पोलिसांनी वाॅर्निंग देवुन सोडुन दिले. या मधे डाॅक्टर, वकील यासंह काही राजकीय पुढारी आणि जेष्ट नागरीक व महिलांचा समावेश होता. या सर्वांना नेरळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी काही सल्ला आणि सुचना दिल्या.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविघ प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडु असे आवाहन शासन वेळोवेळी नागरिकांना करीत आहे. तरीही काहीजण विनाकारण बाहेर पडत आसल्याने अशांवर ठिकठिकाणी पोलिस गुन्हे दाखल करीत आहत. अशाच प्रकारे आज सकाळी नेरळ माथेरान रसत्यावर माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना नेरळ पोलिसांनी तांब्यात घेतले आहे. या सर्वांवर नेरळ पोलिसांनी वाॅर्निंग देवुन कारवाई करुन सोडुन दिले आहे. यामधे सुमारे २३ पुरुष आणि ९ महालांचा समावेश होता. या सर्वांना नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी, बाहेर का फिरू नये, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जेष्ट खास करुन जेष्ट नागरीकांनी बाहेर पडणे टाळावे, घरात आणि घराबाहेरही मास्क वापरावे, असा सल्ला दिल्ला आहे. प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पाटील यांनी या माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना पाटील यांनी येथे दिला आहे.
दरम्यान रायगडात रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांचा मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत अाहे. याच पाश्वभुमीवर नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस अधिकारी अविनाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक तात्या सांवजी, पोलिस हवालदार म्हात्रे, पोलिस नाईक मुनेश्वर, पोलीस हवालदार सुखदेवें, महिला पोलीस लोखंडे, वाघमोडे, धवलकर व अन्य पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम