मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर नियुक्तीला भाजप नेत्याचं कोर्टात आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीला आव्हान?
- by Adarsh Maharashtra
- Apr 19, 2020
- 590 views
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद आमदार म्हणून नियुक्तीला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ठरावाच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांची व्हीडिओ सुनावणी होत असल्याने ही याचिका सुनावणीस केव्हा येईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि पुण्यातील व्यापारी रामकृष्णन उर्फ राजेश गोविंदस्वामी पिल्लई यांनी अॅड. विजय किल्लेदार यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. मंत्रिमंडळाच्या ९ एप्रिलच्या ज्या बैठकीत राज्यपालांना अशी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला, ती बैठकच मुळात बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याने त्यातील निर्णयही बेकायदा ठरतो. त्यामुळे तो रद्द करावा अशी याचिका कर्त्यांची मागणी आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम