चेंबूर येथील खारदेवनगर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा! सार्वजनिक शौचालय बनले सिगारेट ओढणाऱ्या तरुणांचा अड्डा!
- by Adarsh Maharashtra
- Apr 18, 2020
- 1243 views
मुंबई :( जीवन तांबे )चेंबूर येथील खारदेवनगर परिसरत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाला असून भाजीपाला व रेशन दुकानावर लोकांची झुंबड लागलेली पाहायला मिळत आहे. पालिका व पोलीस यंत्रणेचे या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.
खारदेवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून पंधरा ते वीस हजाराची लोकवस्ती आहे. चेंबूर परिसरात कोरोना कोरोनाचे रुग्ण दिवसेदिवस वाढत आहे. राज्य सरकारने संचारबंदी लागू केली असल्याने सुद्धा या परिसरातील नागरिक संचारबंदीची पायमल्ली करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
किसन कांबळे मंडई मार्गावर दुपारी एक वाजेपर्यंत भाजीपाला खरेदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.
या बाजारात बाहेरील भागातील काही फेरीवाले गर्दी करीत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पळताना दिसून येत नाही. अशीच अवस्था रेशन दुकानांसमोर आहे.
सुरेश पेडणेकर मार्गावरील कर्नाटक हायस्कुल ते दुर्गादेवी मैदान दरम्यान संध्याकाळच्या वेळेला काही टपोरी मुले घोळका करून उभे राहतात. तर छत्रपती रहिवाशी संघासमोरील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात काही तरुणांनी सिगारेट पिण्यासाठी अड्डा बनवल्याने त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होत आहे.
संचारबंदीच्या सुरवातीला काही दिवस पोलिसांनी या ठिकाणी बिनकामच्या फिरणाऱ्यांना चांगला प्रसाद दिला होता. मात्र सध्या ते या ठिकाणी फिरकत नसल्याने टावळखोरांचे चांगलेच फावले आहे. गोवंडी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम