आता देशात दर महिन्याला तयार होणार 20 लाख टेस्टिंग किट्स
- by Adarsh Maharashtra
- Apr 18, 2020
- 732 views
दिल्ली:जगातील जवळजवळ सर्वच देश कोरोना संकटाचा पूर्ण शक्तीनिशी सामना करताना दिसत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि टेस्टिंग या दोनच पद्धती सध्या संपूर्ण जगात वापल्या जात आहेत. लॉकडाऊन करून भारताने कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर रोखला आहे. आता भारत टेस्टिंगवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. मे महिन्यापासून भारत दर महिन्याला जवळपास 20 लाख कोरोना टेस्टिंग किट्स तयार करण्यासाठी सक्षम होईल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
या 20 लाख पैकी 10 लाख किट्स रॅपिड अँटीबॉडी असतील तर 10 लाख आरटी-पीसीआरच्या असतील. यामुळे भारतावरील किटच्या आयातीचा बोजा कमी होईल. देशात सध्या 6 हजार व्हेंटिलेटर तयार केले जात आहेत. ही संख्याही पुढे चालून वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढेच नाही, तर पुढील काळात पीपीई आणि ऑक्सिजन डिव्हाईस सारख्या गोष्टीही 'मेक इन इंडिया'च्या धरतीवर तयार करण्याची तयारही भारताने सुरू केली आहे.
मोदी सरकार राज्यांच्या साथीने कोरोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालयांची संख्या वाढविण्यावरही काम करत आहे. देशात शुक्रवारपर्यंत 1919 कोरोना रुग्णालये होती. यात 672 रुग्णालये गंभीर रुग्णांसाठी तर 1247 रुग्णालये मॉडरेट लक्षणे दिसणाऱ्यांसाठी आहेत. देशात सध्या 1,73,746 आयसोलेशन वॉर्ड, 21,806 आयसीयू बेड्स तयार आहेत. आतापर्यंत 5 लाख रॅपिड किट्स चीनमधून भारतात पोहोचल्या आहेत. त्या राज्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम