विक्रोळीत धावत्या बेस्ट बसची धडक बसून एका दुचाकीस्वार पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू.
- by Adarsh Maharashtra
- Apr 14, 2020
- 632 views
मुंबई : ( जीवन तांबे ) कोरोना वायरसचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत आहे त्याच प्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत असल्याने 14 एप्रिल पर्यंत असणारा लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन पोचला आहे त्यामुळे लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता वाहने रस्त्यांवर येत नसल्याने अपघातांचे प्रमाण घटले असून मात्र सोमवारी ता. 13 एप्रिल रोजी सकाळी ठीक. 11 च्या वाजण्याच्या सुमारास विक्रोळी येथील टागोरनगर जवळील जंक्शन येथे एका बेस्ट बसची धडक बसून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
अर्जुन बांबळे हा एक पालिकेचा कर्मचारी आहे तो काम करून आपल्या घरच्या दिशेला दुचाकीस्वार वरून जात होता. परंतु बोरिवली पूर्व स्थानकातून सुटलेली सी- 60 ही एक्स्प्रेस बस नेहमीच्या वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी देवनार आगाराच्या दिशेने निघाली या बसची विक्रोळीतील टागोरनगर जंक्शन येथे दुचाकीस्वार वरून जाणारे पालिका कर्मचारी अर्जुन बांबळे यांच्या दुचाकीस बेस्टची धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार बांबळे गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेतील बांबळे यांना विक्रोळी मधील जवळील असलेल्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तपासा दरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक दादासाहेब भंडारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी विक्रोळी पोलीस ठाणे करत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम