शेतात अर्धा किमी. परिसरात सापडलेल्या चुरगळलेल्या नोटा, मालेगावमध्ये उडाली खळबळ
नेमक्या या नोटा कुणी आणि कशासाठी फेकल्या असाव्यात याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे.
- by Adarsh Maharashtra
- Apr 12, 2020
- 624 views
मालेगाव,: कोरोना व्हायरसमुळे राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहे. परंतु, मालेगावमध्ये एका शेतात २००० रुपयांच्या नोटा रस्त्यावर फेकून दिल्याचं आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मालेगाव तालुक्यातील सौदाणे परिसरातील शेतात हा प्रकार घडला आहे. जवळपास अर्धा किलोमीटरच्या परिसरात चलनी नोटा चुरगळलेल्या अवस्थेत पसरलेल्या होत्या. दोन हजार किंमतीच्या विविध नोटांचा यात समावेश आहे.
१००, २००, ५० आणि २० रुपयांच्या नोटा ठिकठिकाणी इतत्र फेकण्यात आल्या होत्या. शेतात नोटा सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती.
नेमक्या या नोटा कुणी आणि कशासाठी फेकल्या असाव्यात याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोतून पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या. नेमका हा प्रकार आहे तरी का? याचा पोलीस तपास करीत आहे.
कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मालेगावमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नोटांचा पाऊस कुणी पाडला, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
ज्या परिसरात नोटा आढळल्या तिथे जवळपाश अर्धा किलोमीटरपर्यंत ठिकठिकाणी चुरगळलेल्या अवस्थेत नोटा आढळून आल्या आहे. त्यामुळे गावकरीही बुचकळ्यात पडले असून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम