देशात कोरोनाचे २८ रुग्ण - केंद्रीय आरोग्यमंत्री
धक्कादायक! मुंबईत कोरोनाच्या मास्कचा काळाबाजार
- by Adarsh Maharashtra
- Mar 05, 2020
- 1114 views
मुंबई (प्रतिनिधी): भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली आहे. या जीवघेण्या आजाराचा प्रतिकार कसा करायचा यासाठी जगातले सर्व शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. कोरोना पासून जनतेला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नांची शर्थ करीत असताना मुंबईत मात्र कोरोना पासून बचाव करण्यासाठी तोंडाला लावला जाणाऱ्या मास्कचा काळाबाजार सुरू झाला असून एक रुपयांचा मास्क २५ रुपयांना विकला जात आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यातला हा प्रकार असून याबाबत मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान देशात कोरोनाचे २८ रुग्ण असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी संसदेत दिली.
कोरोना भयरासणे संपूर्ण जगात थैमान घातले असून भारतासह ६५ देशातील ८८ हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे. यातील ३ हजार २००लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक चिनी नागरिक आहेत. दरम्यान या रोगाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाला मास्क लावले जात आहेत त्यामुळे मास्कची मागणी प्रचंड वाढली आहे त्याचाच फायदा काही व्यापाऱ्यांनी घेतला असून एक रुपयाचा मास्क २५ रुपयांना विकला जात आहे. मात्र मास्क फक्त रुग्णालय कर्मचाऱ्यांनी लावावा इतरांना त्याची फारशी आवश्यकता नाही असे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सांगितले आहे तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक राज्यात तसेच विमानतळांवर तपासणी सुरू आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी स्पेशल वार्ड तयार करण्यात आले आहेत. भारतात इटलीवरून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर तसेच अन्य १३ कोरोना बाधितांवर कॅम्प मध्ये उपचार सुरू आहेत. दिल्ली देशातील सर्व विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची स्कॅनिंग सुरू करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचे एकही रुग्ण नसल्याचे जरी आरोग्य मंत्र्यांनी सांगितले असले तरी काल इटलीवरून आलेल्या कोरोना संशयितांना पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत. लोकांनी घाबरु नये तसेच अफवा पसरवू नये असे आव्हान सरकारने केले आहे.
कोरोनामुळे होळीच्या रंगाचा बेरंग
कोरोनामुळे सर्वत्र खबरदारी बाळगण्यात येत असून लोकांनी एकत्र येऊन जास्त गर्दी करू नये असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच होळीसाठी जे रंग उधळले जातात त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे तर रंगाच्या पिचकाऱ्या या चीन मधून येत असल्याने यंदा कोणी पिचकाऱ्या आणि रंगही खरेदी करताना दिसत नाही त्यामुळे यंदा होळीच्या रंगाचा बेरंग झाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह होळी खेळणार नाहीत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम