Scooby Dooby Do : शॅगी - स्कूबीची अशी झाली मैत्री

९० च्या दशकातील तुमच्या लाडक्या Scooby चा नवा अंदाज

मुंबई : Scooby Dooby Do.. मुळे ग्रेट डेन्स (Great Danes) ही कुत्र्याची प्रजात अतिशय लोकप्रिय झाली. ९० च्या दशकातील मुलांसाठी हे फक्त एक कार्टून नव्हतं तर त्याहून अधिक होतं. स्कूबीमुळे मुलं खरं बोलू लागले, मैत्री काय असते हे या दोघांमुळे कळलं. तसेच भीतीला दूर करून या दोघांनी विश्वासाने गोष्टी करायला शिकवल्या. 

स्कूबीने शॅगीसोबत अनेक गूढ शोधून काढल्या. शॅगी (Shaggy), फ्रेड (Fred), डॅफ्ने (Daphne), वेल्मा (Velma) ही आहे स्कूबीची गँग. ही गूढ गँग प्रत्येकाच्या लहानपणाची गोड आठवण आहे. SCOOB हा नुकताच 3D ऍनिमेटेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

फ्रँक वेल्कर (Frank Welkar) ने स्कूबीला आवाज दिला आहे. तर विली फोर्टे (Will Forte) शॅगीला आवाज दिला आहे. हा सिनेमा १५ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून पु्न्हा एकदा बालपण जगण्याची संधी मिळणार आहे. तसेच आताच्या मुलांना कार्टूनच्या विश्वासातलं हे वेगळं जग अनुभवता येणार आहे.

संबंधित पोस्ट