दया पवार स्मृती पुरस्कार २०१९ जाहीर: मेघना पेठे, मल्लिका अमरशेख, शीतल साठे यंदाचे मानकरी
यावर्षीचा दुसरा 'बलुतं' पुरस्कार रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना दिवंगत ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जूठन’ या आत्मकथनाचे ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर
- by Adarsh Maharashtra
- Sep 08, 2019
- 1060 views
मुंबई : पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा २०१९ चा दया पवार स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार मेघना पेठे, ज्येष्ठ कवयित्री-लेखिका मल्लिका अमर शेख आणि लोकशाहीर शीतल साठे यांना जाहीर झाला आहे.
गतवर्षी ‘बलुतं’च्या चाळीशीच्या निमित्ताने ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं पुरस्कार’ सुरू करण्यात आलेला पुरस्कार आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नजुबाई गावित यांना दिला होता. यावर्षीचा दुसरा 'बलुतं' पुरस्कार रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना दिवंगत ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जूठन’ या आत्मकथनाचे ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे २० सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार सोहळा होणार आहे अशी माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.
दया पवार स्मृती पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी
प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, हरी नरके, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, सुधीर पटवर्धन, शिल्पा कांबळे, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम