बेस्ट संप: बेस्ट कामगार कृती समितीची च्या शिष्टमंडळ सोबत बैठकीला सुरुवात; आज तोडगा निघण्याची शक्यता

राज्याचे मुख्य सचिव डी के जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि कामगार नेते शशांक राव यांच्यात मंत्रालयात बैठक सुरु असून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई: बेस्टच्या वाहतूक विभागाने पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस असून हा मुंबईतील बेस्टचा सर्वात मोठा संप ठरला आहे. बेस्टचा संप इतके दिवस चालेल अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. शनिवारी सकाळी फक्त एका बस ड्रायव्हरची हजेरी पटावर नोंद झाली आहे. मंगळवारपासून एकही बस मुंबईच्या रस्त्यावर धावलेली नाही.
 संपावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत झालेल्या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. बेस्ट कामागारांच्या समस्यांमध्ये लक्ष घालण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आहे. २५ लाख मुंबईकरांना या संपाचा फटका बसत असून संपामुळे बेस्टचे आतापर्यंत १२ कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांच्या मदतीसाठी स्कूल बस संघटना पुढे आली आहे. या संघटनेने सुमारे १००० स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणखी १००० खासगी बसही सेवा देण्यास तयार आहेत. स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली.

स्कूल बस रस्त्यावर उतरल्यानंतर या बसमधून प्रवास करताना १० किमीपर्यंत मुंबईकरांना २० रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतरच्या अंतरासाठी बेस्ट बस प्रमाणे भाडे आकारणी केली जाईल. तर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल. स्कूल बस मालक संघटना आणि मुंबई बस मालक संघटनेकडून ही सेवा दिली जाणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट