मंचर येथे लग्नाला फॉरेनचे वऱ्हाड

मुंबई येथील अॅडव्होकेट मेघा  गावडे आणि अमोल पडवळ यांचा विवाह नुकताच थाटामाटात पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पार पडला.या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी जर्मनी येथील मेघा गावडे यांच्या मैत्रिणी बॅरिस्टर जेनिफर आणि सराह या वधु वराना शुभेच्छा देण्यासाठी खास जर्मनी येथुन खास आल्या होत्या. या सोहळ्यात त्यांनी वधु वरा सोबत खास आपल्या पाश्चिमात्य शैलीत नाच केला. तसेच वधु वर यांना जर्मनी येथुन आणलेली  खास भेटवस्तू दिली.  या फॉरेनच्या पाटलीनला पाहण्यासाठी लग्नातील वराडी मंडळींनी तौबा गर्दी केली होती. तर अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो काढून नाच देखील केला. आम्ही पहिल्यांदाच जर्मनीहुन लग्नासाठी भारतात आलो आहोत येथे येऊन लग्नातील भारतीय संस्कृती पाहून आम्हाला फार आनंद झाला असून आम्ही भारावुन गेलो आसल्याची माहिती जर्मनीच्या वराडी मैत्रीणि जेनिफर आणि साराह यांनी दिली. या सोहळ्यात वधु वराना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट