मी दलितांना हातपाय बांधून मारते, अट्रोसिटीचा राग दलितांवर काढते- भागेश्री नवटाके यांच्या मुजोरीचा व्हिडीओ वायरल

मी दलितांना हातपाय बांधून मारते आजपर्यंत मी २१ दलितांना फोडून काढले ऍट्रॉसिटीचा राग दलितांवर काढते आणि त्यांना खोट्या केस मध्ये अडकवते.. अशा प्रकारची भाषा सदर महिला पोलिस अधिकारी बोलताना दिसत आहेत

      बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांचा दलितविरोधी वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे दलितांमध्ये संतापाची भावना असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दलित आणि मुस्लिमांना आपण चुकीच्या हत्या प्रकरणात अडकवून त्यांना कशी मारहाण केली ते सांगतानाचा नवटके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओ प्रकरणी स्थानिक दलित संघटनेच्या तक्रारीवरुन बीडचे पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी नवटके यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ असा इशारा दिला आहे.

नवटके यांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये मराठा, दलित असा उल्लेख आहे. बाबूराव पोटभरे यांनी भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये माजलगावच्या महिला पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके या मराठा समाजातील काही सदस्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हे दाखल झाल्यामुळे मदत मिळवण्यासाठी म्हणून मराठा समाजातील सदस्यांनी त्यांची भेट घेतली होती.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट