बोगस टेस्ट रिपोर्ट प्रकरणी प.स. सदस्य सचिन रणवरे विरुद्ध गुन्हा

फलटण : तालुक्यातील आठ रस्त्यांच्या कामाची फायनल बिले घेऊन गुणवत्तेचे बांधकाम साहित्य वापरल्याचा बनावट दाखला केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे फलटण पंचायत समिती सदस्य सचिन कुंडलिक रणवरे यांच्या विरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे गेल्या चार दिवसांपासून येथील अधिकारगृहासमोर उपोषणास बसले असून त्यांनी याप्रकरणी सचिन रणवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 


याबाबत फलटण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सुनिल मनोहर गरुड, उप अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून सचिन कुंडलिक रणवरे रा. कोळकी, ता. फलटण यांना मक्तेदार म्हणून १) सन २०१३ सोनवडी बुद्रुक येथे महादेव मंदिर ते सावतामाळी मंदिर अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे २) सण २०१२ भाडळी खुर्द ते भवानीदेवी  मंदिर रस्ता ग्रामीण मार्ग १९१ सुधारणा करणे ३) सन २०१४ ठाकुरकी वाठार मळा जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे ४) सन २०१४ सोमनथळी येथील फलटण आसू रस्ता करचेवस्ती रास्ता खडीकरण करणे ५) सन २०१४ तावडी ते वऱ्हाड लिंब रास्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ६) सन २०१४ सासकल येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे ७) सन २०१४ झिरपवाडी अंतर्गत रास्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ८) सन २०१४ ठाकुरकी येथे  ज्योतीबा नगर ते बोडरे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ही कामे दिली होती. आठही कामाची फायनल बिले सचिन रणवरे यांनी घेतली असून आठही कामाची योग्य गुणवत्तेचे बांधकाम साहित्य वापरल्याच्या दाखला उप अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उत्तर यांचेकडील पत्र जा.क्र.बांध/ आस्था/ कावि/१०९/२०१८ बांधकाम विभाग उत्तर सातारा जिल्हा परिषद सातारा येथे सचिन रणवरे यांनी जे चाचणी रिपोर्ट आमच्या कार्यालयाकडे पाठवले ते सत्य नव्हते तरी त्यावर असिस्टंट रिसर्च दक्षता व गुन नियंत्रक जिल्हा प्रयोगशाळा सातारा यांची सही व शिक्का होता यावरून मक्तेदार सचिन रणवरे यांनी जे गुणवत्ता चाचणी अहवाल आमच्या कार्यालयात सादर केला ते बनावट चाचणी अहवाल होते. या प्रकरणी फलटण पंचायत समिती सदस्य सचिन कुंडलिक रणवरे यांच्या विरुद्ध भादवी ४६५ व ४६८ अंतर्गत फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी केलेल्या मागणीला यश आल्यामुळे बोगस टेस्ट रिपोर्ट प्रकरणी फलटण तालुक्यातील अजून काही बडे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट