वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना मुंबईत अटक, वंचित बहुजन आघाडी कडून आघाडी सरकारचा निषेध....

बोरघर/माणगांव(प्रतिनिधी)दिल्लीतील शाईन बागच्या धर्तीवर राज्यात किसान बाग आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत  आहे. आज दिवसभर आंदोलन राज्यात चालू झालेले आहे. मात्र मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या आंदोलनाला आता हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी रात्रीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली तर आज सकाळी चांदिवली येथे हे अब्दुल हसन खान यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या गाड्या तसेच पाच बसेस पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याच बरोबर त्यांच्या चालकांनाही पोलिसांनी अटक केली. तर शिवाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अब्दुल बारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवनार येथे समीर लालसरे हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. मुंबईतील नागपाडा भागात अनेक रस्ते बंद  करण्यात आले असून अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.


मुंबईत कार्यकर्त्यांची आज सकाळपासूनच धरपकड करण्यास सुरुवात झाल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असली तरी कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन केले जाईल असे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात येत आहे. मात्र केंद्रातील भाजपसरकार प्रमाणेच राज्यातील आघाडी सरकार हे आडमुठेपणा करत असून त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही, असा निश्चय आघाडी सरकारने केला असल्याचे आता दिसून येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या या आघाडी सरकारचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट