सीमासुरक्षा दलातील डोंबिवलीकर जवानाचा गौरव

डोंबिवली :(प्रतिनिधी)अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेले संजय भगवान कार्ले हे डोंबिवली पूर्वेकडील संगितावाडीत राहतात. अशा या डोंबिवलीकर सीमासुरक्षा दलातील जवानाचा 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी गौरव करण्यात आला.

दत्तनगर चौकातील संकल्प तिर्थावर ठाणे जिल्ह्यातील 150 फूट उंच अशा सर्वोच्च ध्वजस्तंभावर भारतीय तिरंगा फडकविण्यात आला. डोंबिवली शहरातील मानाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात देशासाठी लढणाऱ्या संजय कार्ले या जवानाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हस्ते, तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष गौरव करण्यात आला. गेल्या 20 वर्षांपासून सैनिक म्हणून देशसेवेत असणारे संजय कार्ले 10 ऑगस्ट 2020 साली भारतीय सीमा सुरक्षा दलात केवळ देशसेवेची आवड म्हणून भरती झाले. मुळात शासकीय तंत्रशिक्षण संस्थेतून विद्युत विभागात शिक्षण झालेले व ठाणे येथे उत्तम खासगी कंपनीत नोकरी असताना सुध्दा देश सेवेसाठी काही तरी करावे यासाठी धडपडणारे कर्तुत्व व इच्छाशक्तीच्या जोरावर नियुक्ती झाली. मुळात एकच ज्येष्ठ मुलगा व बहिण असणारा, अत्यंत गरीब कुटुंबातून पण मेहनत घेऊन वाढलेला हा जवान आहे. या जवानाने भारतीय सीमा सुरक्षा दलात नियुक्ती झाल्यानंतर देशसेवेसाठी अखंड वाहून घेतले. आई, वडील, पत्नी व दोन मुली असे या जवानाचे कुटुंब आहे. कार्ले यांच्या गौरवानंतर परिसरातील रहिवाश्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित पोस्ट