मोदी सरकारच्या निषर्धात शेतकऱ्याचा मोर्चा! राजभवनावर जाण्यापूर्वी मोर्चा अडविला!

मुंबई (जीवन तांबे) केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मोदी सरकारचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.

दिल्लीतील केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात कायदे केल्याने त्याचा निषर्धात देशातील  विविध राज्यातील शेतकरी दिल्लीत मोदी सरकारच्या निषेध करीत आहेत याला पाठिंबा देण्याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चा मुंबईमधील आझाद मैदानावर धडकला आहे. तेथून तो  राजभवनावर निवेदन देण्याकरिता मोर्चा धडकणार आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शेतकरी डाव्या विचार सरणीच्या संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, शेतकरी कामगार पक्ष,जन आन्दोलनाची कृती समिती,कामगार संघटना संयुक्त कृती समिती, हम भारत के लोग,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,  पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आप पक्ष, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्षा सहित राज्यातील महाविकास आघाडी सरकारने उघड़ पाठींबा दर्शविलेला आहे. या करिता या पक्षाती अनेक नेत्यांनी या मोर्चात सहभागी झाले होते.

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह निर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड, संजसेविका मेधा पाटकर,काँग्रेस नेते नसीम खान, समाजवादी पक्षाचे मुंबई नेते अबू आज़मी, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप आ.नरसैय्या आडाम, आ.जयंतराव पाटील कुमार केतकर, कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी सहित विविध शेतकरी पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी विविध पक्षाती नेते यांनी आपले विचार मांडले.यावेळी  आमदार - नरसैय्या आडाम यांनी

मोदी व शहा हे दोघे अंबानी व अदानी सोबत या देशावर राज्य करीत आहेत. मोदीना वाटते माझ्या हातात मिलिटरीची फौज आहे. परंतु त्यात शेतकऱ्यांचे मुले आहेत. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. दिल्लीत कित्येक शेतकरी शहिद  झालेत आहेत. मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

300 पेक्षा जास्त बहुमत दीलेल्या भाजपा पक्षाला शेतकरी विरोधात कायदे केल्यामुळे माजलेल्या मोदी सरकारला शेतकरी धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाही. असे सांगत मुंबई काँग्रेस पक्षाचे मुबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी व मोदी सरकारचा निषेध केला.

पंजाब शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. आमच्या फक्त दोनच मागण्यां आहेत.शरद पवारानी आयुष्यभर शेतकऱ्यांच्यासाठी काम केले आहे. काही कायद्यात बदल केलाय. त्यात कायदा बदल करावा

अन्यथा हा संघर्ष सुरुच राहिल असे आमदार  जयंतराव पाटील यांनी जाहीर सांगितले उन्हाचा त्रास सहन करीत शेतकरी बांधव विविध राज्यातून आले आहेत. त्यांनी दिल्लीत आंदोलन केले त्या शेतकरी आंदोलन कर्त्याना मी पाठींबा देण्याकरिता आलो आहे.

ज्यांची देशात सत्ता आहे त्यांना शेतकरी बांधवांचे काही घेणे देणे नाही.मोदी सरकारला याचे  काहीही  घेणं देणं नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अधिकार दिला आहे या घटनेची पायमल्ली मोदी सरकार करीत आहे.शेतकरी व नागरिक तुम्ही केलेल्या कायदयाची पायमल्ली शेतकरी बांधव केल्या शिवाय रहाणार नाही.

कायदे रद्द करा व चर्चा करा असे शेतकरी सांगत आहे. परंतु दिल्ली सरकार ऐकत नाही. जो शेतकऱ्यांना उध्वस्त करतो त्यांना समाज उध्वस्त केल्या शिवाय रहाणार नाही. राज्यपाल यांना कंगना राणावत यांना भेटायला वेळ आहे परंतु ते शेरकर्यांना भेट देण्यास वेळ नाही ते गोव्याला गेले आहे मग निवेदन कोणाला देणार अशी  राज्यपाल व केंद्र सरकारवर टीका केली. शेवटी शरद पवार यांचे भाषण संपल्यावर नेते कार्यकर्त्या सहित राज्यपाल निवेदन देण्याकरिता मोर्चा राजभवनाकडे निघाले असता पोलिसांनी हा मोर्चा मेट्रो सिनेमा जवळ अडविला. त्यामुळे मेट्रो सिनेमा जवळील संपूर्ण मार्ग लाल बावटा, व विविध पक्षाच्या झेंड्यानी फुलून गेला होता. या मोर्चात लाखो शेतकरी व विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे या मार्गावर मोठा पोलीस प्रशासना कडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संबंधित पोस्ट