जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार श्रध्दा लाडला तर मार्गदर्शक पुरस्कार राजेश कळंबटे यांना जाहीर

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत दरवर्षी दिला जाणारा गुणवंत खेळाडू पुरस्कार राष्ट्रीय खो-खोपटू श्रध्दा लाड आणि गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार खो-खो प्रशिक्षक राजेश कळंबटे यांना जाहीर झाले आहेत. याचे वितरण प्रजासत्ताक दिनी (ता. 26 जानेवारी) पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या हस्ते होणार आहे.

गेली दोन दशके खो-खोमधील अनेक गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक, कार्यकर्ते यांनी उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत जिल्ह्याचे नाव राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकवले आहे. दोन्ही पुरस्काराने खो-खो परिवारात आणखी दुहेरी मोहोर लागली आहे. रत्नागिरीची खो-खो पटू श्रध्दा लाड हीने चौदा वर्षांखालील वयोगटात जिल्ह्यातील सर्वात लहान खेळाडू म्हणून राष्ट्रीयस्तरावर भरारी मारली. त्यानंतर 18 वर्षांखालिल, खुला गट, महिला गटामध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवत तिने महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी केली. उत्कृष्ट आक्रमक आणि उत्कृष्ट संरक्षक अशी अष्टपैलू कामगिरी करत तिने खेळात नावलौकिक मिळवला आहे. शिर्के प्रशालेत खो-खो खेळाला सुरवात करणार्‍या श्रध्दाचे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय 11 वी 12 वीचे शिक्षण झाले. गोगटे-जोगळेकर वरीष्ठ महाविद्यालात ती पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल गुणवंत खेळाडू म्हणून तिचा गौरव होत आहे.

राजेश कळंबटे हे यांनी राज्य, राष्ट्रीय पंच म्हणून कामगिरी करतानाच रत्नागिरीतील विविध शाळांमध्ये मार्गदर्शकाची भुमिका बजावली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो पटूंनी राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारली. गेली पंधरा वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत राहत त्यांनी खो-खो चा वारु पुढे नेण्यासाठी योगदान दिले आहे. त्याची दखल घेत जिल्हा क्रीडा विभागाकडून 2020-21 मधील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी राजेश कळंबटे यांची निवड झाली आहे.

खो-खोच्या दुहेरी यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सर्वेसर्वा राज्याचे माजी सचिव संदिप तावडे, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, प्रसाद सावंत, समीर काबदुले, सचिन लिंगायत, मुश्ताक आगा, निलेश कोळंबेकर, शिवराम किनरे, शशिकांत कदम, कृष्णा गावडे, सना साप्ते यांच्यासह जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट