अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामुळे बोरघर गावातील वातावरण अत्यंत मांगल्यपुर्ण आणि भक्तीमय !

बोरघर/माणगांव (प्रतिनिधी) वै. हभप गोपाळ महाराज कांगणे व वै. हभप डॉ महाराज कळसे यांच्या कृपाशीर्वादाने आणि हभप महेश माधव महाराज कळसे यांच्या शुभहस्ते माणगांव तालुक्यातील बोरघर येथे वारकरी संप्रदाय मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ बोरघर यांच्या सहयोगाने  शुक्रवार दिनांक २२ जानेवारी २०२१ ते गुरुवार दिनांक २८ जानेवारी २०२१ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय बोरघर आणि बोरघर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गेली ३३ वर्षे नियमित सालाबादप्रमाणे बोरघर येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे शानदार आयोजन केले जाते. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे हे ३४ वे वर्ष आहे. गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण गावातील वातावरण भक्तीमय झाले असून या अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत अखंड पणे हरिनामाचा गजर आणि नामसंकीर्तन, हरिपाठ, भजन,  प्रवचन, किर्तन, हरिजागर सुरू आहे. 

सदर कार्यक्रमाची रूपरेषा :- पहाटे ४ ते ६ काकड आरती, शुक्रवार दिनांक २२ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत सकाळी ८ ते ११ हभप पंडीत महाराज शेडगे बोरघर, हभप नारायण महाराज पतारे चरई, हभप महेश महाराज कळसे लातूर, हभप गजानन महाराज शेडगे बोरघर,यांचे प्रवचन , दुपारी अन्नप्रसाद, दुपारी ३ ते ४ गाथेवरील भजन, हरिपाठ आणि हरिजागर अनुक्रमे जय हनुमान भजन मंडळ राजाराम बुवा, वारकरी संप्रदाय आमडोशी, वारकरी संप्रदाय बोरघर, आदिमाया भजन मंडळ बुवा नामदेव भागडे,श्री विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ बोरघर, जय हनुमान भजन मंडळ बुवा नथुराम साखरे, मोहेआळी महिला भजन मंडळ बोरघर यांच्या माध्यमातून हरिपाठ, भजन आणि हरिजागर. 

रात्री ९ ते ११ किर्तन अनुक्रमे हभप पंडीत महाराज शेडगे बोरघर, हभप नारायण महाराज पतारे चरई, हभप महेश महाराज कळसे लातूर, हभप सुंदर महाराज निमन कविळवहाळ, हभप महेश महाराज कळसे लातूर आणि हभप पंडीत महाराज शेडगे बोरघर यांचे किर्तन. 

गुरुवार दिनांक २८ जानेवारी अर्थात सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सकाळी ८ ते १० दिंडी सोहळा, सकाळी १० ते १२ हभप महेश महाराज कळसे यांचे काल्याचे किर्तन दुपारी १२ ते २ महाप्रसाद अशा प्रकारे बोरघर येथे सदर अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अाहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

संबंधित पोस्ट