भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात भिमपँथर मा.राजेश गवळी आणि कुमारभाई पंजवाणीच्या नेतृत्वाखाली भीम आर्मी उतरली मैदानात.

मुंबई(प्रतिनिधी)अन्याय विरोधी संघर्ष समिती आणि भीम आर्मीच्या वतीने उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या अनेक गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्यांच्या निषेधार्थ व त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी उल्हासनगर शहरातील वरिष्ठ पत्रकार , ज्येष्ठ साहित्यिक आणि उल्हासनगर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मा.दिलीपजी मालवणकर यांच्या नेतृत्वा खाली उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य द्वारासमोर गेल्या ०७ जानेवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू असून , सदर उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.

लोकशाहीच्या संवैधानिक मार्गाने चाललेल्या या उपोषणाची महापालिका आयुक्त गंभीरपणे दखल घेत नसून युवराज भदाणे यास अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आम्ही भीम आर्मी आणि उल्हासनगर मधील अन्य पक्ष,सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते हे संयुक्ति करित्या महापालिका आयुक्त कार्यालयासमोर दिनांक १३ जानेवारी २०२१ बुधवार रोजी दुपारी ०३.०० वाजता भव्य धरणे आंदोलन आणि मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले होते.त्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली आणि प्रशासन जागी झाले , ताबडतोब त्यांनी भीम आर्मी आणि आंदोलनकर्त्यांना १५  जानेवारी रोजी आयुक्त महोदयांशी आंदोलकांची चर्चा घडवून आणण्यासाठी निर्णायक  बैठक बोलविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरहू रास्ता रोको , धरणे आंदोलन आणि मानवी साखळी आंदोलन रद्द करण्यात आल्याची घोषणा आंदोलनाचे नेते मा.दिलीपजी मालवणकर आणि भीम आर्मीचे नेते भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी संयुक्तरित्या जाहीर केले.

ह्या आंदोलनात भीम आर्मी ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी आणि स्थानिक उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी , मुंबई प्रदेशचे मुख्य संघटक मा.किसन ओव्हाळ , भिवंडी आरपीआयचे शहर महासचिव मा.सोहेबभाई मोमीन , कर्जत तालुकाप्रमुख मा.नम्रताताई ताम्हाणे ,मानखुर्द शिवाजी नगर तालुका प्रमुख मा.सुरेशजी धाडी , तालुका सचिव मा.सुशिलाताई कापुरे , उल्हासनगर शहराचे उपाध्यक्ष मा.शशिभाई जगत्यानी , किशोरभाई चौहान , नंदुभाई काळुंके , नानासाहेब वानखेडे यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हाप्रमुख मा.निलेश येलवे , सुरेशजी जगताप ह्यांच्यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते.

ह्यावेळी बोलताना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर १५ तारखेला सन्माननीय चर्चा झाली नाही तर त्याच ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल , ह्याची नोंद घ्यावी , असे भिमपँथर मा.राजेश गवळी ह्यांनी कळविले आहे.

सदरहू आंदोलनात १) भीम आर्मी.२) बहुजन मुक्ती पार्टी.३) अन्याय विरोधी संघर्ष समिती.४) पत्रकार सुरक्षा समिती.५) प्रेस-संपादक व पत्रकार सेवा संघ. आणि ६) राष्ट्रीय मुलनिवासी नायक पत्रकार संघ ह्यासह इतर सामाजिक संस्था-संघटना सामील झाल्या होत्या.

संबंधित पोस्ट