उल्हासनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मनोबल वाढवण्याकरिता मार्गदर्शन शिबिर .

उल्हासनगर(प्रतिनिधी) :उल्हासनगर मध्ये ज्येष्ठ  नागरिक सेवा संस्थेचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला असुन या वर्धापन दिनी ज्येष्ठ  नागरिकांचा सन्मान करण्यात आला आहे .ज्येष्ठ  नागरिकांचं मनोबल वाढावं हा वर्धापन दिनाचा मुख्य उद्देश आहे.

उल्हासनगर कॅंप  ४ येथील लाल चक्की परिसरात ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचा प्रथम वर्धापन दिन साजरा करताना ज्येष्ट  नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. समाजातील प्रत्येकांनी जेष्ठ नागरिक व वृद्ध व्यक्तींना सन्मानाची वागणूक देणं गरजेचं आहे.आरोग्याची सोयी सुविधा, पालन पोषणाची  जबाबदारी, ज्येष्ठ  नागरिकांचे अधिकार,शासनाच्या योजनांची धोरणे या महत्वपूर्ण विषयांवर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात व नायब  तहसीलदार सुखदेव गवई  यानी  मार्गदर्शन केलं.तर या वेळी ज्येष्ट  नागरिकांचा सन्मान करण्यात आला.ज्येष्ट  नागरिकांचे मनोबल वाढावे,त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे,हा ज्येष्ट  नागरिक सेवा संस्थेचा उद्देश आहे .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन  विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात,नायब तहसिलदार सुखदेव गवई ,नगरसेविका ज्योती  माने माधवनबाग लाल चक्की चौक चे डॉ.हणमंत कारंडे,भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे  अध्यक्ष प्रफुल भोसले,व ज्येष्ठ    नागरिक उपस्थित होते.यावेळी 

संस्थेचे अध्यक्ष आरआर निकुंभ व कार्याध्यक्ष अध्यक्ष अनिल मराठे,सचिव आर बी कोल्हे यांनी मान्यवर व ज्येष्ठ  नागरिकांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट