पुरुषाला नपुंसक म्हणणे ही त्याची बदनामी; पती मानहानीचा दावा ठोकू शकतो: मुंबई उच्च न्यायालय

मुंबई: एखाद्या पुरुषाला नपुंसक म्हणणं ही त्याची बद्नामी असल्याचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. या निकालामुळे ज्या पुरुषांवर नपुंसकतेचा आळ लावत घटस्फोटाचे खटले भरवले जातात त्यांना दिलासा मिळणार आहे.  एका महिलेने काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची मागणी केली होती.तिची मागणी तर मंजूर झाली पण तिच्या मुलीचा ताबा मात्र तिच्या पतीला मिळाला. आर्थिकदृष्ट्या तिचा पती मुलाला सांभाळण्यासाठी जास्त सक्षम आहे असं मत कुटूंब न्यायालयाने व्यक्त केलं होतं. याविरोधात तिने हायकोर्टात दाद मागितली. तसंच दाद मागताना पती नपुंसक असल्याचा दावा तिने केला. त्यांच्या या मुलीचा जन्म कृत्रिम आयव्हीएफ तंत्राने झाल्याची माहितीही तिने दिली.  पण या आरोपामुळेच तिला उच्च न्यायालयाने फटकारले.' हातात काहीही पुरावे नसताना एखाद्या पुरुषाला नपुंसक म्हणणे हा त्याच्या पुरुषत्वाचा अपमान आहे. जोपर्यंत डॉक्टर तो नपुंसक असल्याचा पुरावा देत नाहीत तोपर्यंत त्याला नपुंसक म्हटल्यास ही त्याची बद्नामी होईल. तसंच तो पुरूष याविरोधात मानहानीचा दावा ठोकू शकतो'. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित महिलेला घटस्फोट आणि मुलीचा ताबा मिळवणं अधिकच कठीण झालं आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट