रुस्तोमजी' रियालिटी डेव्हलपरचे व्यवस्थापक 'बोमन इराणी' यांना मुंबई पोलिसांचे अभय! पाच गुन्हे दाखल असूनही कारवाई नाही

रुस्तोमजी' रियालिटी डेव्हलपरचे व्यवस्थापक 'बोमन इराणी' यांना मुंबई पोलिसांचे अभय! पाच गुन्हे दाखल असूनही कारवाई नाही

बिल्डरधार्जिण्या पोलिसांच्या विरोधात एकता संस्थेचे राकेश शेट्टी यांचा मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा!

मुंबई : डीएनएनगर म्हाडा जमिनीवरील पुनर्विकास प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम कंपनी 'रुस्तोमजी' चे व्यवस्थापक बोमन इराणी यांच्यावर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणुकीचे आणि चोरीचे गुन्हे (एफआईआर) दाखल करण्यात आलेले आहेत. सन २०१५ पासून ते २०१७ पर्यंत कलम ३७९,४०६, ४२०, ३४, मोफा(महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट) अंतर्गत असे एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु आजतागायत मुंबई पोलिसांकडून बोमन इराणींची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही की अटक करण्यात आली नाही. एफआईआर दाखल होऊनही अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्न उभा राहतो. असे एकता-पॉवर ऑफ युथ अँड युनिटी चे संस्थापक अध्यक्ष राकेश शेट्टी यांनी पोलिसांच्या बिल्डरधार्जिण्या भूमिके विषयी आणि या प्रकरणाविषयी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच बोमन इराणीला अटक व्हावी आणि त्यांना पाठीशी घालणारे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांचे निलंबन करावे या मागणीसाठी मंत्रालया समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्याकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न- राकेश शेट्टी यांचा आरोप
डीएननगर येथील म्हाडा जमिनीवरील पुनर्विकास प्रकरणात 'रुस्तोमजी' रियालिटी डेव्हलोपरचे व्यवस्थापक बोमन इराणीवर आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. तपास अधिकारी बजरंग पराग यांनी तपास करून संपूर्ण अहवाल वरिष्ठ निरीक्षक मधुकर जवळकर यांना सादर केला, त्यामध्ये बोमन इराणींना अटक करा असे नमूद केले. जवळकर यांनी ९/५/१८ रोजी सहा आयुक्त शिंदे यांच्याकडे पाठविला. शिंदे यांनी कारवाईच्या परवानगीसाठी उपायुक्त पराग मणेरे यांच्याकडे अहवाल पाठविला, परंतु अहवालात इराणी यांना अटक करण्यात यावी असे नमूद असतांना सुद्धा उपायुक्त पराग मणेरे यांनी अंमलबजावणी केली नाही. तसेच बोमन इराणीला घोटाळायातून वाचविण्यात सहकार्य करीत आहेत असा आरोप राकेश शेट्टी यांनी केला.

Adarsh Maharashtra

रिपोर्टर

संबंधित पोस्ट