शिराळा पंचायत समितीच्या उप सभापतीपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. बी. के. नायकवडी यांची निवड

सांगली:(आनंद बेगडे)शिराळा पंचायत समितीच्या उप सभापतीपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. बी. के. नायकवडी यांच्या माध्यमातून  तालुक्याच्या पश्चिम विभागाला मिळाला आहे. श्री. नायकवडी हे समाजाप्रती तळमळ असलेली व एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यांनी पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने प्रेरीत होऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. गोर-गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटना, धरण व प्रकल्प ग्रस्त संघटना, विद्यार्थी संघटना, अशा विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सतत चांगले काम केले आहे.जनसामान्यांच्या अडीअडचणी कोणतीही अभिलाषा न ठेवता सोडवत असतात. त्यांच्या हातून शिराळा तालुक्यातील समाजाप्रती चांगले काम होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट