पंढरपूरात दत्तात्रय तरळगट्टी यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न.

पंढरपूर(भारत कवितके)रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२०  रोजी पंढरपूर ,नाथ चौक कवठेकर प्रशाळा कलामंचावर पंढरपूरातील साहित्यिक दत्तात्रय तरळगट्टी यांच्या ' पंढरीचे मानबिंदू  ( व्यक्ती चित्रण ) व ' र ' ला ' र ' अान् ' ट 'ला ' ट ' ( काव्यसंग्रह) अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ पार पडला.

समिक्षा प्रकाशन पंढरपूर व्दारा प्रकाशित करण्यात आलेल्या  दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते सोशल डिस्टन्स ठेवून ,मास्क लावून सरकारी नियमाचे पालन करण्यात आले होते शिक्षण पत्रकारीता,साहित्य क्षेत्रातील मोजकेच रसिक उपस्थित होते.प्रकाशात नसलेल्या  पण आठवणीत राहणार्या काही पडद्या मागील व्यक्तीचे चित्रण लेखन ' पंढरीचे मानबिंदू ' या पुस्तकात लेखकाने केले आहे,सामान्य माणसाचे व लेखकाचे ' पाहणे ' हे वेगवेगळे असते.साहित्यिक दत्तात्रय तरळगट्टी  हे वारकरी संप्रदायचे असल्याने व पेशाने उपमुख्याध्यापक असल्याने त्यांचे लिखाण सकारात्मक ,सात्विक असल्याचे आढळते,साहित्यिकांना इतरांच्या आनंदातच परमानंद मिळत असतो.अशा प्रकारचे मौल्यवान विचार व्यासपिठावरील मान्यवरांनी व्यक्त केले.या प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक,आमदार दीपक आबा साळंके पाटील,कार्यक्रमाचे अधक्ष नानासाहेब रत्नपारखी ,जेष्ठ समिक्षक वि.मा.मिराजदार दै.पंढरी संचारचे अनिरूद्द बडवे,व्याख्याते दिलीप फलटणकर, कल्याणराव शिंदे,जेष्ठ लेखिका माणसीताई केसकर,द.ह.कवठेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक डबीरसर,कवठेकर प्रशाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णीसर आदि मान्यवर मंचावर उपसंथित होते,शेवटी कुलकर्णी सरांनी लेखकाला शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट