पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त ; १८ गावठी पिस्तुलं आणि २७जिवंत काडतूसं हस्तगत

पुणे २१ सप्टेंबर: पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पुणे हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून १८गावठी पिस्तुलं आणि २७ जिवंत काडतूसं हस्तगत केली. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ४ आरोपी हे शिरूर परिसरातले आहेत. या सर्वांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात ही शस्त्रे येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली.

अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ पिस्तुलं, २७ जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटार सायकल असा एकूण मिळून ५ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. हडपसर पोलिसांची शहर आयुक्तालयातील मोठी कारवाई आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्तुलं व जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. या आरोपी कडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट