उल्हासनगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला सुरवात

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला सुरवात झाली आहे . या अभियानाचे उध्दाटन महापौर लिलाबाई आशान यांच्या हस्ते झाले असुन या अभियानांतर्गत सुरु असलेल्या मोहिमेत ५८८ पथके तयार केली आहेत . 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ' माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सध्या सर्वत्र सुरु झाली असुन उल्हासनगर महापालिकेने देखिल या अभियानाला सुरवात केली आहे . या अभियानांतर्गत सुरु केलेल्या मोहिते ५८८ पथके तयार केली आहेत . दरम्यान या मोहितेत सहभागी होवुन सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला १५०रु स्वयंसेवकाना २०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे . दरम्यान पॅनल निहाय घरोघरी जाऊन करन्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी नागरी हेल्थ पोस्ट सेंटर च्या एम ओ एच सहा स्वयंसेवक अशी पथकातील रचना आहे . तर ५८८ पथके तयार केले असताना ही पथके नियमित पणे प्रत्येक पॅनल मध्ये जाऊन गृहभेटी देणार आहेत . त्यांच्या सोबत एक आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिलेले दोन स्वयंसेवक असणार आहेत . त्या कर्मचाऱ्याना प्रतिदिन १५० रुपये . आणि स्वयंसेवकाना प्रतिदिन २०० रुपये प्रोत्साहान भत्ता देन्यात येणार आहे . या पथका मार्फत रोज ५० घराना भेटी दिल्या जाणार आहेत . तर घरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करन्यात येणार आहे . दरम्यान या प्रत्येक पथका मागे एक वैद्यकिय अधिकारी हे राहणार असुन त्यांचे मार्फत औषधोपचार व संदर्भ सेवा देन्यात येणार आहे . तर या अभियानाची सुरवात झाली असुन महापौर लिलाबाई आशान यांच्या हस्ते उध्दाटन झाले आहे . यावेळी उपमहापौर भगवान भालेराव . सभागृह नेता राजेंद्र चौधरी . विरोधी पक्ष नेता किशोर बनवारी . नगरसेवक अरुण आशान . नगरसेविका सौ अंजलीताई साळवे . नगरसेवक गजानन शेळके . अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर . उपायुक्त मदन सोंडे . वैद्यकिय अधिकारी डॉ . दिलीप पगारे . आणि नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते .

संबंधित पोस्ट