नगरसेवक आकाश पुरोहित यांनी केले तुळशी वाटप

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  वाढदिवसानिमित्त नगरसेवक आकाश पुरोहित यांनी सेवा सप्ताहचे आयोजन केले होते त्यात त्यांनी भुलेश्वर येथे विभागात तुळशी वाटप केले. भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष तथा आमदार मंगलप्रभात लोढा व युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांच्या अध्यक्षतेखाली,मा.कॅबिनेट मंत्री तथा आमदार राज के पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली, कुलाबा विधानसभा आमदार राहुल नार्वेकर यांच्या निर्देशनाखाली, दक्षिण मुंबई जिल्हाअध्यक्ष शरद चिंतनकर व युवा मोर्चा दक्षिण मुंबई जिल्हाअध्यक्ष सनी सानप यांच्या संयोगाने व युवा नगरसेवक तथा अध्यक्ष प्रभाग समिती आकाश राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली आज भुलेश्वर येथील जलाराम बाप्पा हॉल येथे रक्तदान शिबीर आणि भुलेश्वर फुलगल्ली येथे तुळशी वाटप केले. यात पुरोहित यांनी ११०० तुळशी रोपांचे विभागात वाटप केले. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान असून प्रत्येक घरात तुळस असायलाच हवी त्याने मॅन प्रसन्न राहून लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे आम्ही हा तुळस वाटप कार्यक्रम घेतला असल्याची माहिती नगरसेवक आकाश पुरोहित यांनी दिली. कार्यक्रमाला युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना,भाजपा दक्षिण मुंबई जिल्हाअध्यक्ष शरद चिंतनकर,युवा मोर्चा दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सनी सानप, वॉर्ड अध्यक्ष २२१ जसवंतसिंह राठोड,जयेश शहा,नूतन सोनी,संजय मण्यार,दत्ताभाई शेजवल,राकेश नेवरेकर,अभिजित चव्हाण,कुलदीप शहा आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट