वांगणी येथे शेजाऱ्याला जिवंत जाळणाऱ्या निखिल गुरव ला अटक.

बदलापुर (प्रतिनिधी) : वांगणी शेजारी असलेल्या डोणे गांवात किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातुन चंदकांत पवार (४८) याना निखिल गुरव याने पेट्रोल टाकुन जिवंत जाळन्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन यात पवार यांचा मृत्यु झाल्याने बदलापुर ग्रामिण पोलिसानी गुरव याला अटक केली आहे . तर या आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक या कलमांचा सुध्दा सामावेश करुन आरोपी गुरव याला पोलिस कोठडीत दाबले आहे .

वांगणी जवळ असलेल्या डोणे गांवात विश्वनाथ अपार्टमेंट मध्ये राहणारे चंद्रकांत यांची २४ वर्षीय मुलगी ही त्यांच्या संकुलातील सी विंग मधे गेल्या आठवड्यात विजे चे बिल घेन्या साठी गेली होती . तेव्हा त्याच संकुलात राहणाऱ्या प्रमिला गुरव यांचा पवार यांच्या मुली सोबत वाद झाला होता . त्याच वादाचा राग मनात धरुन प्रमिला गुरव यांचा मुलगा निखिल गुरव (२५) हा दारुच्या नशेत १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चंद्रकांत पवार यांच्या घरी गेला . व त्यांची पत्नि व मुलाला मारहाण करु लागला तेव्हा त्याना वाचविन्या करिता पवार हे मध्ये पडले असता अगोदरच गुरव याने सोबत आणलेले पेट्रोल पवार यांच्या अंगावर ओतुन त्याना पेटवुन दिले . त्या आगीत पवार हे गंभिररित्या भाजले

असल्याने त्याना प्रथम वांगणी येथिल आरोग्य केंद्रात उपचारा करिता नेले . मात्र तेथे व्यवस्थित उपचार होत नसल्याने त्याना उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयात नेले परंतु तेथे ही त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्याना मुंबई येथे हलविन्यात आले . पण त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने बुधवारी त्यांचा मृत्यु झाला आहे . तेव्हा बदलापुर ग्रामिण पोलिसानी चंद्रकांत पवार याना जिवंत जाळल्या प्रकरणी निखिल गुरव याला अटक केली आहे . तर न्यायालयाने त्याला चार  दिवस पोलिस कोठडीत ठेवन्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित पोस्ट