पत्रकारांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीसाठी पत्रकार संघाच्यावतीने निवेदन

पालघर (प्रतिनिधी) : कोरोना काळात जीव धोक्यात घालून वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना योध्दे म्हणून ५० लाखाचे विमा संरक्षण मिळावे तसेच आजारपणाच्या काळात आरोग्य विमा संरक्षण मिळावे, या मागणीसाठी वाडा तालुका पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवारी (१७ सप्टेंबर) तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील  एका कार्यक्रमात बोलताना  पत्रकार हे कोरोना यौध्दे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनानं २५

पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही. तर पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत  पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र त्यावरही अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत शासनाने

लवकरात लवकर निर्णय घेऊन पत्रकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्यभरातील पत्रकारांनी केली असून या अनुषंगाने वाडा पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवारी (१८ सप्टेंबर) वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सल्लागार व जेष्ठ पत्रकार रमेश पाटील, अध्यक्ष जयेश शेलार, सचिव रुपेश मोकाशी, उपाध्यक्ष दिनेश यादव, सचिव रुपेश मोकाशी, कार्याध्यक्ष वैभव पालवे, मच्छिन्द्र आगीवले, सचिन भोईर, शशिकांत कासार,  संपर्क प्रमुख व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभाग संघटक संजय लांडगे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट